У нас вы можете посмотреть бесплатно पारंपारिक पद्धतीची भाजणीची चकली | Traditional Bhajanichi Chakali или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#chakalirecipe #bhajanichichakli #bhajanichichakali #chakalirecipeinmarathi @CookingWithSurekhaa Namaskar, welcome to our channel. Check the pinned comment for the full Bhajanichi Chakali recipe in English. Below is the Bhajanichi Chakali recipe in Marathi: भाग १: भाजणी (चकली पिठ) तयार करणे साहित्य: १. तांदूळ – ४ वाटी (५०० ग्रॅम) २. चणा डाळ – २ वाटी (२५० ग्रॅम) ३. मूग डाळ – १ वाटी (१२५ ग्रॅम) ४. उडीद डाळ – १ वाटी (१२५ ग्रॅम) ५. धणे – ५ टेबलस्पून ६. जिरे – ५ टेबलस्पून कृती: 1. धान्ये धुवा आणि वाळवा: तांदूळ, चणा डाळ, मूग डाळ, आणि उडीद डाळ व्यवस्थित धुवा. धुतल्यानंतर पाणी निथळून धान्ये ४ तास सुकत ठेवा. हे भिजेलेले धान्य उन्हामध्ये सुकत न ठेवता पंख्याखाली ठेवावे जेणेकरून धान्य खूप सुकवले जाणार नाही. 2. धान्ये भाजून घ्या: ४ तासांनी जेव्हा धान्य अगदी थोड ओलसर असेल तेव्हा, जाड बुडाची कढई गरम करून त्यात वाळलेली धान्ये प्रत्येकी १० मिनिटे भाजा – ५ मिनिटे उच्च आचेवर आणि ५ मिनिटे मध्यम आचेवर. सतत ढवळत राहा, जेणेकरून धान्य जळणार नाहीत. 3. धणे आणि जिरे फक्त गरम करा: वरील धान्य भाजून झाले की गॅस बंद करून त्यावर धणे आणि जिरे 1-2 मिनिटे कढईत गरम करा, त्यांना भाजू नका. त्यांचा सुगंध येईपर्यंत गरम करणे पुरेसे आहे. 4. पीठ तयार करा: भाजलेली धान्ये थंड झाल्यावर त्यांना मिक्सरमध्ये किंवा गिरणीत जाडसर दळून घ्या. पिठ खूप बारीक नको, ते थोडे जाडसर असावे. या मिश्रणातून अंदाजे १२ कप भाजणी तयार होईल, जी नंतर चकली बनवण्यासाठी वापरता येईल. भाग २: चकली बनवणे साहित्य (११ वाटी पाण्यात मिसळण्यासाठी): १. हळद – १ टेबलस्पून २. हिंग – १ टेबलस्पून ३. तिखट – ३ टेबलस्पून ४. ओवा – ३ टेबलस्पून ५. तीळ – ३ टेबलस्पून ६. खसखस – ३ टेबलस्पून ७. मीठ – २ टेबलस्पून ८. तेल – १२ टेबलस्पून (प्रत्येक कप भजनीसाठी १ टेबलस्पून तेल) कृती: 1. 11 वाटी पाणी गरम करा एका मोठ्या भांड्यात ११ वाटी गरम करा त्यात हळद, हिंग, तिखट, ओवा, तीळ, खसखस, मीठ, आणि तेल घाला. सर्व साहित्य नीट एकत्र मिसळा. 2. भाजणी पिठ आणि पाणी मिक्स करा: तयार केलेल्या पाणी-मसाला मिश्रणात हळूहळू भाजणी पिठ घाला. मिश्रण गुठळ्या न होऊ देता सतत ढवळत रहा. पीठ आणि पाण्याचे मिश्रण चांगले एकजीव करा. २ तास पीठ असच झाकून ठेवा. 3. पीठ मळा: २ तासांनी पीठ मऊ पण घट्ट असावे, जेणेकरून ते चकली बनवणाऱ्या साच्यातून सहज निघेल. 4. चकलीचे आकार द्या: थोडे पीठ घेऊन चकली साच्यात भरून छान आकारात एका ताटावर चकल्या काढा. 5. चकली तळा: कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर चकल्या त्यात सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. टीप - चकल्या जेव्हा तयार होतात तेव्हा त्या कढई मधल्या तेलाला बुडबुडे येणं बंद होते तेव्हा आपण समजावे की चकल्या छान तळल्या गेल्या आहेत. 6. थंड करून साठवा: तळलेली चकली काढून टिश्यू पेपरवर ठेवा, जेणेकरून जास्तीचे तेल निघून जाईल. चकली पूर्णपणे थंड झाल्यावर ती एअरटाईट डब्यात साठवा. chakli recipe, chakli recipe in marathi, chakli chi bhajani, chakali bhajani recipe in marathi, chakli kashi banvaychi, chakli recipe without machine, chakli recipe maida, chakli recipe rice flour, chakli recipe in marathi instant, chakli recipe in marathi tandul, chakli recipe in marathi bhajni, chakli recipe in marathi besan, chakli recipe in marathi rice, bhajni chakli recipe in marathi, bhajni chakli, bhajni chakli recipe, bhajni chakli recipe in hindi, bhajni chakli ukad, bhajani chakli praman, bhajani chakli, bhajnichi chakli recipe in marathi, bhajnichi chakli recipe, bhajnichi chakli, bina bhajanichi chakli, south indian chakli recipe, chakli ki recipe, bhajani chakli recipe in marathi, bhajnichi chakli recipe, diwali chakli recipe, chakli bhajni, shankarpali, shankarpali recipe, chivda recipe, chakli chi recipe, besan chakli recipe, chivda, karanji