У нас вы можете посмотреть бесплатно Shirwal Caves | Shirwal Buddhist Caves | शिरवळ बुद्ध लेणी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिरवळ लेणी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे असलेल्या बौद्ध लेण्या आहेत. या लेण्यांची संख्या साधारणपणे १५-१६ आहे, ज्यात एक चैत्य आणि बाकी विहार आहेत. या लेण्यांना 'पांडवदरा' असेही म्हणतात आणि त्या सातवाहन काळातील असून ऐतिहासिक महत्त्व आहे. हे ठिकाण पुणे-बंगळूर महामार्गाजवळ आहे. ही ठिकाणे फारसे लोकप्रिय नाहीत, त्यामुळे गर्दी कमी असते. हे ठिकाण भोर मार्गावर आहे आणि नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे. एका लेणीत स्तूप आहे. या लेणी इसवीसन पूर्व ५० ते १५० या कालावधीत कोरलेल्या लेण्यांपैकी असाव्यात, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या लेणींचा उल्लेख भोर संस्थानच्या तत्कालीन वस्तू संग्रहालयातील ताम्रपटात आढळतो. त्यानुसार राष्ट्रकूट वंशातील ध्रुव राजाने इसवी सन ७८० मध्ये दिलेल्या ताम्रपटात या लेणींचे वर्णन आढळते. याशिवाय सदाशिव आत्माराम जोगळेकर यांच्या १९५२च्या 'सह्याद्री' या पुस्तकातही या लेणींचा उल्लेख असून, या डोंगराला 'लयणगिरी' आणि शिरवळ गावाला 'श्रीमाळ, श्रीवलय, सिरीवलय' म्हणून ओळखत असल्याचे म्हटले आहे. अलीकडे त्याचे नाव पांडवदरा असे पडले. सहाव्या लेणीजवळ मोठा खडक आहे. पावसाळ्यात या खडकावरून धबधबा वाहतो. एका लेणीत आठ फूट उंचीचा अर्धवर्तुळाकार स्तूप आहे. त्यावर कोणताही मजकूर नाही. येथे शिवपिंडही दिसते. पिंडीच्या शेजारी चैत्यगृह असून, पुढील लेणीत बौद्ध भिक्खूंसाठी आठ खोल्या कोरलेल्या दिसतात. तेल आणि वात लावण्यासाठी भिंतींवर छोट्या आकारील देवड्या किंवा कोनाडे आहेत. दोन लेण्यांखाली पाण्याचे ठाव आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लेणींचा आकार एकसारखा नाही. हवा आणि उजेडासाठी काही ठिकाणी खिडक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. काही लेणींमध्ये बसण्यासाठी ओटे कोरलेले आहेत. चौदा लेण्यांच्या वरील बाजूला मोठ्या आकाराचे पाण्याचे तळे आहे. तळ्यामध्ये बाराही महिने पाणी असते. तळ्यासमोर चार छोट्या आकारातील खोल्या असून, डोंगराच्या पायथ्याशी तीन लेणी आहेत. या लेणींची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे तिथे दगड, माती आणि झुडपांचे साम्राज्य आहे. संपूर्ण लेणीसमूहात शिलालेख अथवा कोणतीही माहिती कोरल्याचे आढळत नाही. कोरीव खांब व फारसे नक्षीकामही नसल्याने या लेणी दुर्लक्षित राहिल्या असून, त्यांचा अभ्यासही झाल्याचे दिसत नाही. या लेणींबद्दल पर्यटकांनाही फारशी माहिती नाही. पुणे-सातारा महामार्गालगत शिरवळच्या हद्दीत अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या दुर्लक्षित ठेव्याचे जतन होणे आवश्यक आहे. केंद्र अथवा राज्य पुरातत्त्व विभाग आणि संबंधित शासकीय विभागाने अभ्यास करून लेणींची देखभाल करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. भोर संस्थानचे कारभाराच्या व्यवस्थेसाठी पाच विभाग होते. त्यानुसार रोहिडा उर्फ विचित्रगड, राजगड, प्रचंडगड, पौनमावळ आणि सुधागड ही तालुक्यांची ठिकाणे होती. शिरवळ, नसरापूर, वेल्हे, कोळवण, पाली ही या तालुक्यांची ठाणी होती. शिरवळजवळच्या पांडवदऱ्यातील लेणी माती आणि दगडाने भरल्या होत्या. तत्कालीन श्रीमंत राजेसाहेब यांनी त्यांची स्वच्छता करून जाण्यासाठी पाऊलवाट तयार करून घेतली. २९ जून १९३६ रोजी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील इतिहासतज्ज्ञ प्रा. अनंत सदाशिव आळतेकर यांच्यासह त्यांनी या ठिकाणी भेटही दिली होती The Shirwal Caves were built between 100 BCE and 170 CE during the early phase of Buddhism, carved directly into basalt rock as part of India’s rock-cut architectural tradition. They consist of one Chaitya (prayer hall with a stupa) and fourteen Viharas (monastic dwellings). 🪨 Construction Timeline • Dating: Scholars place the caves between 100 BCE – 170 CE, aligning them with the Satavahana period in the Deccan. • Phase: They belong to the early Buddhist architectural phase, characterized by simplicity and minimal ornamentation. • Purpose: • Chaitya (Cave 1): Built as a prayer hall with a central stupa, later adapted with a Shiva lingam by locals. • Viharas (Caves 2–15): Monastic residences for Buddhist monks, with small cells cut into the rock. 🛠️ How They Were Built • Rock-cut technique: o Carved into basalt rock hills using chisels and hammers. o The process involved removing rock layer by layer to create halls, cells, and the stupa. • Design style: o Plain interiors without elaborate carvings, unlike later caves such as Ajanta. o Focused on functionality—providing shelter and meditation spaces for monks. • Community effort: Likely sponsored by local rulers, merchants, and devotees who supported Buddhist monastic life. ✨ Cultural Significance • The caves reflect the spread of Buddhism in Maharashtra during the Satavahana era. • The fusion of traditions is evident: while originally Buddhist, the Chaitya later became a Hindu worship site with a Shiva lingam. • They are part of the larger network of Deccan Buddhist caves, alongside Karla, Bhaja, and Bedse. #shirwal #cave #caves #maharashtra #maharashtradesha #nearpune #pune #satara