У нас вы можете посмотреть бесплатно 🌎राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या 'रुबाब'चे अकोल्यात 'रुबाबात'स्वागत🤗 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक व दिग्दर्शक 'शेखर बापू रणखांबे'यांचा परिसस्पर्श लाभलेला मराठी चित्रपट 'रुबाब' अकोल्यातील न्यू रिगल चित्रपटगृहात सहा फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झाला.या चित्रपटाचे अकोल्यातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट आवडल्याचे प्रेक्षकांनी सांगितले. टीव्ही,मोबाईल व ओटीटीमुळे सध्या राज्यातील चित्रपटगृह व मराठी चित्रपटसृष्टी मोठ्या संक्रमणावस्थेतून जात असल्यामुळे अकोल्यात रुबाबचे झालेले उत्स्फूर्त स्वागत आशेचा किरण दाखविणारे ठरले आहे.झी स्टुडिओज व झणकर फिल्म्स निर्मित आणि शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित रुबाब हा चित्रपट प्रसिद्ध सैराट चित्रपटानंतर मराठी सिने रसिकांच्या आशा पल्लवीत करणारा ठरला आहे.रुबाब म्हणजे तुमची प्रतिष्ठा,ऐट, दरारा किंवा सामाजिक दबदबा नेमका कशात आहे,हे ओळखायला हा चित्रपट शिकवतो.हा चित्रपट बेधडक प्रेमापेक्षा निरागस प्रेम जपायला सांगतो.'तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे ही या चित्रपटाची आकर्षक ओळ आजच्या युवा पिढीला खूप आवडल्याचे समाज माध्यमांवर दिसून आले आहे. नव्या दमाचे कलावंत या चित्रपटाची जमेची बाजू असून गाणी व संगीताने मनाला भुरळ घातली आहे.ही एक ग्रामीण भागातील प्रेम कथा असून ती सांगण्यापेक्षा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचा आनंदच मोठा असेल.या चित्रपटात संभाजी ससाने,शितल पाटील,सिमरन खेडकर,विशाल शिरतोडे,अभिजीत सकटे आदी कलावंतांच्या भूमिका असून त्यांनी त्या प्रामाणिकपणे साकारल्या आहेत. चित्रपटातील 'मन जुळले' हे गाणे घराघरात गुणगुणले जात आहे.सिनेमाचे दिग्दर्शन,संगीत,पार्श्वसंगीत,ध्वनि संयोजन,सिने मेट्रोग्राफी,कोरिओग्राफी उच्च दर्जाची आहे.या चित्रपटामध्ये नावांच्या पाट्यांचा अनोखा उपयोग करण्यात आला आहे. या पाट्या चित्रपटांमधील प्रेक्षकांची आवड टिकवून ठेवतात. हा चित्रपट अकोल्यात लागण्यासाठी प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक व शॉर्ट फिल्म मेकर आणि शेखर बापू रणखांबे यांचे मित्र डॉ.राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला होता.अकोला शहरात गांधी रोडवर मोठे फलक लावण्यात येऊन त्याद्वारे चित्रपट पाहण्याचे आवाहन करण्यात आले होते. रसिक अकोलेकरांनी 'रुबाब'चे विधिवत उद्घाटन केले.त्याप्रसंगी डॉ. राजेश देशमुख,अंबादास हरणे,विनायक कोकाटे,सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी नारायण वाडेकर,सेवानिवृत्त अभियंता बाबर,सिने पत्रकार अंबादास तल्हार,सुनील डुकरे,नाकासकर,विशाल कांबळे,न्यू रिगल चित्रपटगृहाचे व्यवस्थापक व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.हा चित्रपट अकोल्यातील डाबकी मार्गावरील मॉर्निंग ग्रुपने पाहिला. रुबाब पाहिल्यानंतर रुबाबदार वाटत असल्याचं रसिक प्रेक्षकांनी सांगितलं.प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या परिसरात रुबाब नावाचा जल्लोष केला.या प्रेक्षकांनी किरण न्यूज च्या माध्यमाने प्रतिक्रिया व्यक्त करतांना चित्रपटाचा उत्तरार्ध विशेष आवडल्याचे सांगितले.मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.