У нас вы можете посмотреть бесплатно चांदपूर किल्ला | Chandpur Fort | विदर्भ Series EP17 | भंडारा किल्ले | Bhandara Forts | Vidarbha Fort или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चांदपूर किल्ला चांदपूर किल्ला, भंडारा महाराष्ट्रातील अनेक भुईकोट किल्ल्यांना अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. केवळ शहरी भागातील किल्लेच नव्हे तर ग्रामीण भागातील किल्ले देखील त्याला अपवाद नाही. सुधारणेच्या नावाखाली या किल्ल्यावर होणाऱ्या बांधकामामुळे किल्ल्यावरील अवशेष नष्ट होत चालले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील असलेला चांदपूर किल्ला हा देखील शेवटच्या घटका मोजत आहे. उर्वरित अवशेष नष्ट होण्याआधी लवकरात लवकर या किल्ल्याला भेट द्यायला हवी. चांदपुर किल्ला भंडारा शहरापासून 52 किलोमीटर अंतरावर तर तुमसर या तालुक्याच्या ठिकाणापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. चांदपूर गावात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी उपलब्ध नसल्याने खाजगी वाहतुकीचा पर्याय शोधावा लागतो. चांदपूर गावात शिरण्याआधी अलीकडे असलेल्या वळणावरील लहानशा टेकडीवरच चांदपूर किल्ला वसलेला आहे. या वळणावरून किल्ल्यावर जाणारी पायवाट असून किल्ल्यावर असणाऱ्या दर्ग्यामुळे टेकडीवर जाण्यासाठी नव्याने सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. याशिवाय गावातून एक पक्का गाडी रस्ता या किल्ल्यातील दर्ग्यापर्यंत हल्लीच बांधलेला आहे. या सर्व बांधकामामुळे किल्ल्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. पायऱ्यांच्या वाटेने जाताना उध्वस्त तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश केल्यावर समोर दोन बाजूला दोन बुरुज उभारलेले आहे. किल्ल्यावर आलेला रस्ता हा किल्ल्याची तटबंदी व दरवाजाचे उरलेसुरले अवशेष पाडून वर आणलेला आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला एक एकर परिसरात पसरलेला असून टेकडीच्या उतारावर बांधलेल्या या किल्ल्याच्या तटबंदी चार टोकाला चार ढासळलेले बुरुज पाहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली असून आज ही तटबंदी केवळ सहा सात फूट उंच शिल्लक आहे. किल्ल्यात सुफी संताचा दर्गा असून इतर काही थडगी पाहायला मिळतात. किल्ल्यात फेरी मारताना एक वाड्याचा चौथारा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसून येत नाही. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची पाण्याची सोय आज दिसून येत नाही. असल्यास काळाच्या ओघात नष्ट झाली असावी. किल्ल्याचा परिसर फारच लहान असल्याने पंधरा मिनिटात आपली गडफेरी पूर्ण होते. महानुभव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथात भंडारा जिल्ह्याचा उल्लेख अनेकदा येतो. निसर्गाचे वरदान लाभलेला हा प्रांत 1743 पर्यंत गवळी राजवटीखाली होता व त्यानंतर नागपूरकर भोसले यांच्या अंमलाखाली आला. इसवीसन 1853 साली नागपूरकर भोसले यांच्या ताब्यात असलेला हा प्रांत इंग्रजांच्या हाती गेला. संदर्भ - दुर्ग भरारी #Chandpur #ChandpurFort #VidarbhaForts #BhandaraForts #NagpurForts #Gondraja