У нас вы можете посмотреть бесплатно लोणच्याचे २ प्रकारचे मसाले, तेही प्रमाणासह | आता लोणचं विकत आणायची गरज नाही | Homemade pickle masala или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लोणच्याची रेसिपी कितीही अवघड वाटली, तरी ती खूप सोपी आहे. फक्त प्रमाण बरोबर असायला हवं. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, लोणच्याचे 2 प्रकारचे मसाले कसे करायचे, ते दाखवलं आहे. आणि त्याचबरोबर योग्य प्रमाण ही दिलेलं आहे. ही पद्धत वापरुन तुम्ही लोणचं नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🙏😀 मसाला प्रकार पहिला:- १)मोहरीची डाळ १०० ग्रॅम २)मीठ दीडशे ते 180 ग्रॅम ३)तिखट( मिरचीची पावडर) बेडगी मिरचीचे पन्नास ग्राम आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो ४)तेल तीनशे ml ५)मोहरी एक चमचा ६)हिंग दहा अधिक पाच ग्रॅम ७)मेथीचे दाणे एक चमचा ८)हळद एक चमचा कृती:- १) प्रथम एक किलो लोणच्याची आंबट कैरी घेऊन धुऊन पुसून अगदी कोरडी करावी २) कैरीचा देठाचा भाग काढून टाकावा ३) कैरीचे साला सगट आपणास हवे तसे लहान मोठे तुकडे करावेत ४) चार-पाच चमचे मीठ लावून आठ दहा तास कैरीच्या फोडी मुरत ठेवाव्यात ५) मोहरीची डाळ अगदी गरम केलेल्या भांड्यात घालून दोनदा तीनदा भाजावी गॅस बंद करून हलवत राहावे. ६) नंतर कापडावर किंवा ताटात पसरून डाळ गार करावी. ७) मीठ पण अगदी तापलेल्या कढईत घालून दोनदा तीनदा हलवावे गॅस बंद करून पुन्हा तीन-चार मिनिटे हलवून मीठ ताटात ओतून गार करावे. ८) एका साध्या भांड्यात भाजलेली मोहरीची डाळ, भाजलेले मीठ ,तिखट ,पाच ग्रॅम हिंग , तळून बारीक केलेली मेथीची पूड घालावी, एकत्र करावे. फोडणी करणे:- प्रथम तेल कडकडीत तापवून गॅस बंद करावा दोन मिनिटांनी मोहरी घालावी, मोहरी तडतडली की त्यात हळद व हिंग, व अर्धा चमचा मेथी दाणे घालावे , फोडणी कोमट करून वरील तयार मसाल्यावर ओतावी तयार मसाला चिरलेल्या कैरीत घालावा, मिठाचे सुटलेले कैरीचे पाणी लोणच्या करता वापरावे त्याने कैरी नासत नाही. कैरीच्या लोणच्याचा दूसरा मसाला:- १)लोणच्याची आंबट कैरी एक किलो २)मोहरीची डाळ १०० ग्रॅम ३) मीठ दीडशे ते 180 ग्रॅम ४)तिखट 50 ग्रॅम ५)मोहरी एक चमचा ६)हिंग दहा अधिक दहा ग्रॅम ७) तेल तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम ८)बडीशेप एक चमचा ९)लवंगा आठ दहा १०)वेलदोडे आठ दहा ११)मेथी दाणे एक चमचा १२) मिरेदाणे एक सपाट चमचा १३)दालचिनी एक मोठा(२इंच) तुकडा १४)दहा अधिक दहा ग्रॅम हींग १५)मोहरी एक चमचा १६)हळद एक चमचा कृती:- प्रथम बडीशेप ,धने ,मेथीचे दाणे ,मिरे, लवंग, दालचिनी वेलदोडे ,एकत्र करून मिक्सरवर बारीक करून घेणे (फार बारीक करू नये). मसाला:- नंबर एक मध्ये सांगितल्याप्रमाणे मेथीची डाळ भाजून घ्यावी ,मीठ भाजून घ्यावे , एका कोरड्या स्टीलच्या भांड्यात भाजलेली मोहरीची डाळ, मीठ ,तिखट ,दहा ग्रॅम हिंग ,वरील धन्याचा कुठलेला मसाला एकत्र करावे, दुसऱ्या कढईत तीनशे ते साडेतीनशे एम एल तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी घालावी, फोडणी थोडी गार झाल्यावर त्यात एक चमचा कलौंजी, दहा ग्रॅम हिंग ,एक चमचा हळद घालावी , फोडणी थोडी गार झाल्यावर फोडणी वरील एकत्र केलेल्या मसाल्यात ओतावी व हलवावे,( फोडणी फार गार होउ देवू नये) दोन तास मसाला तेलात मुरू द्यावा, कैरीच्या चिरलेल्या फोडी व कैरीला सुटलेल्या पाण्यासकट मसाल्यात घालून मसाला एकत्र करून ठेवावा गोड लोणचे करायचे असेल तर वरील लोणच्यात एक वाटी किसलेला गूळ , बारीक गूळ घालावा. अजून लोणच्याच्या संदर्भातल्या जास्त माहितीसाठी ,टीप्स "लोणच्याची तयारी "हा व्हिडिओ बघावा:- • लोणचं कसं घालावं ह्या बद्दलच्या सर्व शंकां... -------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #लोणचं #मसाला #घरगुती #homemade #picklemasala #picklerecipe घरच्या घरी लोणचं कसं करावं, लोणचं कसं करावं, लोणचं रेसिपी मराठी, लोणचं मसाला कसा तयार करावा, लोणचे मसाला रेसिपी, कैरीचे लोणचे मसाला, how to make homemade pickle, homemade pickle recipe in marathi, pickle masala recipe marathi, how to make pickle masala, लोणचं, मसाला, घरगुती, homemade, pickle masala, pickle recipe,