У нас вы можете посмотреть бесплатно दुष्काळग्रस्त भागात कोकणच फिल - चिंच विसावा कृषी पर्यटन केंद्र - जत, सांगली | Concept Agro Tourism или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दुष्काळग्रस्त भागात कोकणच फिल - "चिंच विसावा" कृषी पर्यटन केंद्र - Concept Agro Tourism शेगाव ता. जत जि. सांगली उज्वला बोराडे /प्रल्हाद बोराडे चिंच विसावा - कृषी पर्यटन केंद्र मु. पो. शेगांव, तालुका जत जिल्हा सांगली.416404 महाराष्ट्र, इंडिया संपर्क : +91 8888310882, +91 9657078882 Google Map Location - https://goo.gl/maps/WYPwbTvAtzonBpBA7 Tap the link below to know about Chinch Visava agro tourism centre चिंच विसावा ऍग्रो टुरिझम सेंटरच्या संपूर्ण माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा https://linktr.ee/chinchvisava Vaibhav Gadahire Photography Instagram : / vaibhav_gadahire_photography Nusta Fir Instagram / nusta_fir For Promotion Contact: nustafir@gmail.com जत तालुका म्हटलं की भयंकर दुष्काळ हे कोणास नाही आठवले तर नवलच. पाण्याअभावी शेती करायची म्हणून आम्ही चिंच झाड निवडले व 20 वर्षांपूर्वी 50 झाडे लावली. चिंचेची शेती हा एक आगळा वेगळा प्रयोग होता, बरेच लोक हसत होते परंतु मला निसर्गाची आवड होती आणि खात्री होती की चिंच चांगले पीक देऊ शकते तेही कमी पाण्यात, कमी कष्ट आणि कमी खर्चात. चिंचेमुळे वातावरणात आमूलाग्र बदल होतो, एक झाड 5 एअर कंडिशनर या झाडांच्या रुपाने असे 250 AC बसवल्याचा आनंद मला मिळत होता. 20 वर्षानंतर हे आता एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण उदयास आले आणि चिंच विसावा चा जन्म झाला. माझी पत्नी सौ.उज्वला बोराडे व माझे कुटुंब यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रकल्प येथे साकारलाय. शहरी तसेच ग्रामीण भागातील पिढीला आपल्या वाडवडिलांच्या समृध्द ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून देता येईल, या पद्धतीने या केंद्राची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक रोजगार निर्मिती, स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषी मालाला मार्केट व योग्य दर उपलब्ध होण्यासाठी या कृषी पर्यटन क्षेत्राचा उपयोग होईल. जत सारख्या दुष्काळी भागामध्ये तरुण शेतकरी वर्गास नवी दिशा, नवी शेतीची पद्धत कळेल हा अठ्ठाहास साध्य होतोय. धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेले सुख-समाधान शोधण्यासाठी , दुनियादारीच्या तणावा मधून कोणतेही मेडिसिन न घेता मूड फ्रेश करण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्यावी, असं डेस्टिनेशन... येथे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे व फुलझाडे, मसाल्याची विविध झाडे, फळभाज्या आहेत. यातून येणारास ज्ञानात भर पडेल याची आम्ही ग्वाही देतो. झाडांना विविध प्रकारचे झोपाळे बांधले आहेत, आराम करण्यासाठी बाजली आहेत. बसण्यासाठी खुर्ची नाही तर लाकडी ठोकळे आहेत. मुलांना खेळण्यास पार्क आहे येथे जुने पारंपरिक खेळ म्हणजे - विटी-दांडू, गोट्या, नाग्या, भोवरा, रगोली, लेझीम , टिपऱ्या ,मुलींसाठी गजगे, जिभल्या इ खेळाचा अनुभव घेता येईल. वाचक प्रेमींसाठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण पद्धतीचे चुलीवरचे जेवण म्हणजे अविस्मरणीय आनंद मिळायलाच हवा. भरपूर झाडे असल्यामुळे तुमच्या जोडीला वेगवेगळे पक्षी आहेत, त्यानां पाहण्यात व त्यांचे फोटो काढण्यात खरी गंमत येणार. राहण्यासाठी शीतल निवास, रवी निवास व सावली निवास अशी 3 लाकडी घरे ज्याला आपण झोपड्या म्हणतो जिथे नैसर्गिक AC लावण्याचा अनुभव येणारच. कुटी १९०० हे प्रदर्शन रूप घर आहे येथे आपणास जाते, चूल, उकळ, मडक्याची उतरंड, शिंके, दिवा व ठाणवी, फनेरपेठी- आरसा व हळदी कुंकु साठी बघायला मिळेल. हे सर्व पाहून आपल्या आजी आजोबांचे जीवन हे किती सुंदर होते याची कल्पना येईल आणि हेवा वाटेल आणि म्हणाल, हेचि देगा देवा! या सर्व गोष्टी आणि निसर्ग म्हणजे फोटो काढण्यास जणू पर्वणीच आणि त्यातच भर म्हणजे आम्ही पारंपरिक वेष देतो जेणेकरून आपण शेतकरी, आजी आजोबा यांच्या वेशात दिसू शकाल. चिंच विसावा कृषी पर्यटन केंद्र हे 4 एकर परिसरामध्ये वसले आहे. येथे 105 चिंचेची झाडे व 675 आंब्याची झाडे आहेत. या व्यतिरिक्त लाल जट्रोफा, मधुमालती, बकुळी, जास्वंद, अंजीर,रातराणी, पारिजातक, मोगरा, देशी गुलाब,चिक्कू, मोसंबी, जाई, जुई, ख्रिसमस,पेरू, मोरपंखी, गवती चहा, लिंबू, निशिगंधा, कडीपत्ता, वॉटर अप्पल, देशी पेरू,सोनचाफा, कवठी चाफा, पुडीका चाफा, संत्री, लिची, स्वस्तिक,दालचिनी,लौग,मिरी,इलायची,बनारसी पान, आंबा, नारळ, केळी, आवळा, वॉटर लिली, पुदिना, आळु,शेवगा इत्यादी फळे, फुले व भाज्या बघण्यास व अभ्यासास मिळतील विहीर , पाईप लाइन, ठिबक सिंचन व शेतीची इतर अवजारे , साधने बघायला मिळतील जीवनाचा खरा आनंद अशा या निसर्गरम्य वातावरणात मिळेल व या केंद्रास परत भेट द्यावी व आपल्या इतर मित्र , नातेवाईक याना आवर्जून सांगावे वाटेल व स्वतःला चिंच विसावा ला भेट दिल्याबद्दल अभिमान वाटेल असे हे निसररम्या ठिकाण म्हणजे दुष्काळी भागातील कोकण. मंडळी, आम्हास गर्व आहे की अशा दुष्काळी भागात आपणास कोकण दर्शन घडवतो व आपल्या सेवेस सतत चिंच विसावा हजर रहातो. येथे आपण डे विझिट, डे नाईट आणि नाईट स्टे असे वेगवेगळे पॅकेजेस निवडू शकता. याव्यतिरिक्त वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, डोहाळे जेवण, छोटे लग्न इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करू शकता वेगवेगळी फोटोग्राफी जसे प्री वेडिंग, वेब सीरिअल, मॉडेलिंग साठी सुद्धा चिंच विसावा हे ठिकाण मस्तच! धन्यवाद!!! उज्वला बोराडे /प्रल्हाद बोराडे चिंच विसावा - कृषी पर्यटन केंद्र मु. पो. शेगांव, तालुका जत जिल्हा सांगली.416404 महाराष्ट्र, इंडिया संपर्क : +91 88883 10882, +919657078882 ~-~~-~~~-~~-~ Please watch: "Best Villa In Lonavala With Pool | 4 BHK | Lonavala Villa With Pool" • Best Villa In Lonavala With Pool | 4 BHK |... ~-~~-~~~-~~-~