У нас вы можете посмотреть бесплатно रायगड जिल्ह्यातला सर्वात सुंदर समुद्रकिनारा! दिवेआगरला अनुभवला सोनेरी सूर्यास्त!! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मंडळी 2026 वर्षाच्या पहिल्या कोकण ट्रिपची प्लानिंग करताना आम्ही ठरवले की या वेळेला आम्ही न फिरलेल्या जागी जाऊन तिथलं निसर्ग सौंदर्य पहायचे आणि काळजात शहाळी भरलेल्या तिथल्या कोकणी माणसांशी संवाद साधायचा. यातलं पहिलं ठिकाण आहे दिवेआगर! दिवेआगर हा सुंदर किनारा रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन जवळ आहे आणि इथे राहण्या खाण्याची चांगली सोय आहे. सुरुवातीला इथल्या श्री सुवर्ण गणेश मंदिरामुळे प्रसिद्धीला आलेले हे गाव हळूहळू इथल्या इतर पर्यटन स्थळांमुळे प्रचलित होत आहे. त्यामध्ये इथली पुरातन मंदिरे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला असा भला मोठा पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा जास्तीत जास्त पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. शनिवार रविवार आणि इतर सुट्टीच्या वारांमध्ये इथे तुम्हाला हमखास गर्दी पाहायला मिळते. जवळपास सर्व घरांमध्ये तुम्हाला होमस्टेची सुविधा आहे. तसेच खानावळी मधून इथली पारंपारिक मेजवानी सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. जर तुम्ही दिवेआगरला यापूर्वी कधी गेला नसाल आणि आमची व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, तर नक्की पुढच्या कोकण सफरीमध्ये दिवेआगरला भेट द्या! व्हिडिओ पाहून आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंट द्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद.