У нас вы можете посмотреть бесплатно उपासनासंगीत गीत क्र 001 Parampavitra Sarvsamartha или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🙏 उपासना गीत-गायन अभियान 🙏 प्रथम परमेश्वराचे मनःपूर्वक आभार मानत, आपण सर्व श्रोते-प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत! स्वर्गीय दूत अहोरात्र ज्या जगन्नायकाचे ईशस्तवन करीत आहेत, त्या सर्वसमर्थ परमेश्वराची ओळख झाल्यावर आपणही महाकवी नारायण वामन टिळक यांच्यासह भक्तिभावाने म्हणू लागतो — ✨ "मुकुट काढुनी तुला अर्पुनी, धरूनी सुखदायक भावा, परमपवित्रा, पवित्र अवघे गाती, तव करि तीसेवा." ✨ 🎵 आजच्या उपासना गीतमालेत, “उपासनासंगीत” या प्रसिद्ध भक्तिगीत संग्रहातील गीत क्र. १ — या गीतातून आपण त्या सर्वसमर्थ परमेश्वराची महानता अनुभवणार आहोत. 🎤 हे सुंदर सादरीकरण ऐका — 👉 लई भारी पुणेरी कलामंच यांच्या हौशी गानवृंदाच्या मधुर आवाजात. ❤️ Support the Channel 👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा 🔔 SUBSCRIBE करून नवीन उपासना गीतांसाठी जोडलेले राहा 💬 आपली प्रतिक्रिया जरूर कळवा 📞 संपर्कासाठी 📱 98226 39917 📱 95525 96778 📱 98339 66324 उपासनासंगीत गीत क्र. १ ईश्वरस्तवन परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभु देवा, । "प्रभातसमयी मंगलगीते करितो आम्ही तव धावा. ।।ध्रु।। परमपवित्रा, दयासागरा, पराक्रमाचा तू ठेवा, । व्यक्ति त्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा. ।।१।। मुकुट काढुनी तुला अर्जुनी, धरूनी सुखदायक भावा, । परमपवित्रा, पवित्र अवघे गाती, तव करिती सेवा. ।।२।। दूत तुझे साष्टांग घालुनी स्तविती तुझिया मधु नावा, । तू होताशी, आजहि असशी, सदैव असशिल तू, देवा. ।।३।। परमपवित्रा, अंधकार जरि मनुजापुढती पसरावा, । पापमया दृष्टीस तयाच्या दर्शनलाभ न तव व्हावा. ।।४।। पवित्र तरि तू, कुणी तुझ्याविण पवित्र न जगी गवसावा, । प्रेमबलाने पावित्र्याने सदा पूर्ण तू, विश्वधवा ! ।।५।। परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभु देवा, । भूस्वर्गी, सागरी तुझ्या ह्या कृति गाताती तव नावा. ।।६। परमपवित्रा, दयासागरा, पराक्रमाचा तू ठेवा, । व्यक्ति त्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा. ।।७ ।। रेव्ह. नारायण वामन टिळक (६ डिसेंबर १८६१ - ९ मे १९१९) Closing Credits: लई भारी पुणेरी कलामंच गायिका : रश्मी कालसेकर क्लेरा काळे लूसी आढाव एलिझाबेथ विधाते ज्योत्स्ना काळे ॲलिस लोबो साधना कदम प्राजक्ता राठोड रिबेका पवार रिबेका अवघडे रिटा म्हस्के साधना रणदिवे