У нас вы можете посмотреть бесплатно #1 आम्ही पॉडकास्ट का सुरु करतोय आणि इतर गप्पा. [Why Start a Marathi Podcast?] или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बरणी आता पॉडकास्टच्या माध्यमातून परत येत आहे. माणूस म्हणून स्वतःला सुधारण्याची ईर्षा बाळगून या उपक्रमाला आम्ही हात घातला आहे. आमच्या या उपक्रमाला आपले आशीर्वाद लाभतीलच याची खात्री बाळगून आम्ही या पॉडकास्टचा शुभारंभ करत आहोत. . आमच्या पॉडकास्टच्या या पहिल्या-वहिल्या एपिसोडमध्ये, आम्ही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या आहेत. . नीट बोलायला, आपले विचार स्पष्टपणे मांडायला कसं शिकावं? मुलांना शाळेत घालावं की घरीच शिकवावं? स्वतःला सुधारणं का महत्त्वाचं असतं? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान का आणि कसा राखावा? या आणि संबंधित विषयांवर आम्ही चर्चा केली आहे. आम्ही कोणत्याही विषयातले तज्ज्ञ नाही, आम्हाला कशावरूनही दुसऱ्यांना सल्ला देण्याचा काही एक अधिकार नाही. स्वतःचं व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही या गप्पा मारलेल्या आहेत. विचारांचं आदान-प्रदान करूनच माणूस शिकतो, आणि त्यातूनच तो सुधारत जातो. यावर आमचा ठाम विश्वास आहे. विषयांची अनुक्रमणिका आणि वेळा - 00:00 लोकांशी बोलताना कोणती काळजी घ्यावी? 13:48 माणसाचे चांगले-वाईट गुण 20:34 मराठी आणि इंग्रजीची भेसळ 24:04 शाळा आवडायची का? शाळेत का जायचो? 28:43 शाळेत काय शिकायला मिळतं? 32:00 एका वर्गात किती मुलं असावीत? 33:28 शाळा की होमस्कूलिंग? 34:51 मुलांची कल्पनाशक्ती 38:02 Optimal Deprivation 40:50 फोन वापरणारी मुलं 44:56 शाळेव्यतिरिक्त शिकण्याचे मार्ग 48:54 करिअरच्या मार्गांबद्दल माहिती कशी द्यावी 54:33 मुलांसाठीची गुंतवणूक 59:30 आधी आपण स्वतः शिकायला हवं 01:04:26 स्वतःला सुधारायची गरज 01:06:25 मूर्खपणा करूनच आपण शिकतो 01:06:57 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दुखऱ्या भावना 01:16:19 परकीय संस्कृतींशी संघर्ष 01:19:40 समारोप आमचा पहिला प्रयत्न कसा वाटला ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा.