У нас вы можете посмотреть бесплатно आपला देव आपणच ठरवायचा? Self-Help आणि मनाचे श्लोक । श्लोक ३५ । कौस्तुभ । वेदांत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आम्ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करत आहोत. या व्हिडिओमध्ये मनाच्या ३५व्या श्लोकावर चर्चा केली आहे. श्लोक - असे हो जया अंतरीं भाव जैसा । वसे हो तया अंतरीं देव तैसा । अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।। ३५ ।। देवाची व्याख्या प्रत्येकाच्या मनात वेगळी असते, त्याच्याबद्दलच्या आपल्या कल्पनेतही सतत बदल घडत राहतात. जी कल्पना माझ्या मनात असेल, ती इतर कोणाच्या मनात जशीच्या तशी असण्याची शक्यता कमीच, आणि माझ्यातल्या अशा 'अनन्य' देवाचं रक्षण चापपाणी म्हणजे धनुर्धारी राम माझ्या माध्यमातूनच करत असतो, असा या श्लोकाचा एक अर्थ या चर्चेत मांडला आहे. चर्चेमध्ये डॉ. अलोक कनोजिया (Dr. K) यांनी सांगितलेल्या ईगो डेथचा (Ego Death) संदर्भ आलेला आहे. त्यांच्या Alex O'Connor सोबत रंगलेल्या एका चर्चेचा दुवा इथे दिला आहे - • Atheist vs Christian vs Spiritual Thinker:... व्हिडिओमध्ये दाखवलेली छोटीशी चित्रफीत या लिंकमधील व्हिडिओतूनच घेतलेली आहे, आणि सदर व्हिडिओ त्याच्या निर्मात्याच्या मालकीचा असून आम्ही फक्त तो पाहण्याची शिफारस केलेली आहे. बोलता बोलता संत तुकडोजी महाराज यांच्या 'मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव' या अभंगावर आणि संत तुकारामांच्या 'आनंदाचे डोही आनंद तरंग' या अभंगाचाही संदर्भ आला आहे. देव असतो की नसतो या प्रश्नावरून होणाऱ्या चर्चा वायफळ का असतात यावरही आम्ही आमचे विचार मांडलेले आहेत. आपल्या अभिप्रायाचं, सूचनांचं स्वागत आहे.