У нас вы можете посмотреть бесплатно Dasbodh dashak 17 samas 2 chalu samas nirupan श्रीमत् दासबोध चालू समास निरूपण दशक 17 समास 2 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
॥ श्रीराम ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । जैसें गगन अंतराळ । निराकार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥ अंतचि नाहीं तें अनंत । शाश्वत आणी सदोदित । असंत नव्हे तें संत । सर्वकाळ ॥ २ ॥ परब्रह्म तें अविनाश । जैसें आकाश अवकाश । न तुटे न फुटे सावकास । जैसें तैसें ॥ ३ ॥ तेथें ज्ञान ना अज्ञान । तेथें स्मरण ना विस्मरण । तेथें अखंड निर्गुण । निरावलंबी ॥ ४ ॥ तेथें चंद्र सूर्य ना पावक । नव्हे काळोखें ना प्रकाशक । उपाधीवेगळें येक । निरोपाधी ब्रह्म ॥ ५ ॥ निश्चळीं स्मरण चेतलें । त्यास चैतन्य ऐसें कल्पिलें । गुणासमत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ६ ॥ गगनीं आली अभ्रछ्याया । तैसी जाणिजे मूळमाया । उद्भव आणी विलया । वेळ नाहीं ॥ ७ ॥ निर्गुणीं गुणविकारु । तोचि शड्गुणैश्वरु । अर्धनारीनटेश्वरु । तयास म्हणिजे ॥ ८ ॥ आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति । तेथेऊन पुढें नाना वेक्ती । निर्माण जाल्या ॥ ९ ॥ तेथून पुढें शुद्धसत्व । रजतमाचें गूढत्व । तयासि म्हणिजे महत्तत्त्व । गुणक्षोभिणी ॥ १० ॥ मुळीं असेचिना वेक्ती । तेथें कैंची शिवशक्ती । ऐसें म्हणाल तरी चित्तीं । सावधान असावें ॥ ११ ॥ ब्रह्मांडावरून पिंड । अथवा पिंडावरून ब्रह्मांड । अधोर्ध पाहातां निवाड । कळों येतो ॥ १२ ॥ बीज फोडून आणिलें मना । तेथें फळ तों दिसेना । वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ॥ १३ ॥ फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । तैसा विचार असे । पिंडब्रह्मांडीं ॥ १४ ॥ नर नारी दोनी भेद । पिंडीं दिसती प्रसिद्ध । मुळी नस्तां विशद । होतील कैसीं ॥ १५ ॥ नाना बीजरूप कल्पना । तींत काये येक असेना । सूक्ष्म म्हणोनि भासेना । येकायेकीं ॥ १६ ॥ स्थूळाचें मूळ ते वासना । ते वासना आधीं दिसेना । स्थूळावेगळें अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥ कल्पनेची सृष्टी केली । ऐसीं वेदशास्त्रें बोलिलीं । दिसेना म्हणोन मिथ्या केली । न पाहिजेत कीं ॥ १८ ॥ पडदा येका येका जन्माचा । तेथें विचार कळे कैंचा । परंतु गूढत्व हा नेमाचा । ठाव आहे ॥ १९ ॥ नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥ २० ॥ नवरीस नवरी नलगे । ऐसा भेद दिसों लागे । पिंडावरून उमगे । ब्रह्मांडबीज ॥ २१ ॥ नवरीचें मन नवर्यावरी । नवर्याचें मन नवरीवरी । ऐसी वासनेची परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥ वासना मुळींची अभेद । देहसमंधें जाला भेद । तुटतां देहाच समंध । भेद जेला ॥ २३ ॥ नरनारीचें बीजकारण ।शिवशक्तीमधें जाण । देह धरितां प्रमाण । कळों आलें ॥ २४ ॥ नाना प्रीतीच्या वासना । येकाचें येकास कळेना । तिक्षण दृष्टीनें अनुमाना । कांहींसें येतें ॥ २५ ॥ बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुषाचेनी । उपाधी वाढे जयेचेनी । ते हे वनिता ॥ २६॥ वीट नाहीं कंटाळानाहीं । आलस्य नाहीं त्रास नाहीं । इतुकी माया कोठेंचि ना हीं । मातेगेगळी ॥ २७ ॥ नाना उपाधी वाढऊं जाणे । नाना मायेनें गोऊं जाणे । नाना प्रीती लाऊं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥ पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परें वासनेस । बांधोन टकिलें ॥ २९॥ ईश्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें । लोभाचें गुंडाळें केलें । उगवेना ऐसें ॥ ३० ॥ ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची माहां गोडी । हे मुळींहून चालिली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥ मुळीं सूक्ष्म निर्माण जालें । पुढें पष्ट दिसोन आलें। उत्पतीचें कार्य चाले। उभयतांकरितां ॥ ३२ ॥ मुळीं शिवशक्ती खरें । पुढें जालीं वधुवरें । चौर्यासि लक्ष विस्तारें । विस्तारली जे ॥ ३३॥ येथें शिवशक्तीचें रूप केलें । श्रोतीं मनास पाहिजे आणिलें । विवरलियांविण बोलिलें। तें वेर्थ जाणावें ॥ ३४ ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे शिवशक्तिनिरूपणनाम समास दुसरा ॥ dasbodh chalu samas vartman samas वर्तमान समास dasbodh in marathi manache shlok #dasbodh #दासबोधनिरूपण #दासबोध #chalusamasnirupan #gurucharitra #manacheshlok #gurudevdatta #manacheshloknirupan #manacheshlokwithlyrics