У нас вы можете посмотреть бесплатно Dasbodh dashak 17 samas 1 दासबोध चालू समास निरूपण दशक 17 समास 1 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
॥ श्रीरामसमर्थ ॥ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा । चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्वरु ॥ १ ॥ सकळ जगाचा ईश्वरु । म्हणौन नामें जगदेश्वरु । तयापासून विस्तारु । विस्तारला ॥ २ ॥ शिवशक्ती जगदेश्वरी । प्रकृतिपुरुष परमेश्वरी । मूळमाया गुणेश्वरी । गुणक्षोभिणी ॥ ३ ॥ क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्त साक्षी । अंतरात्मा सर्वसाक्षी । सुद्धसत्व महत्तत्त्व परीक्षी । जाणता साधु ॥ ४ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वरु । नाना पिंडी जीवेश्वरु । त्यास भासती प्राणीमात्रु । लहानथोर ॥ ५ ॥ देहदेउळामधें बैसला । न भजतां मारितो देहाला । म्हणौनि त्याच्या भेणें तयाला । भजती लोक ॥ ६ ॥ जे वेळेसी भजन चुकले । तें तें तेव्हां पछ्याडिलें । आवडीनें भजों लागले । सकळ लोक ॥ ७ ॥ जें जें जेव्हां आक्षेपिले । तें तें तत्काळचि दिधलें । त्रैलोक्य भजों लागलें । येणें प्रकरें ॥ ८ ॥ पांचा विषयांचा नैव्यद्य । जेव्हां पाहिजे तेव्हां सिद्ध । ऐसें न करितां सद्य । रोग होती ॥ ९ ॥ जेणें काळें नैव्यद्य पावेना । तेणें काळें देव राहेना । भाग्य वैभव पदार्थ नाना । सांडून जातो ॥ १० ॥ जातो तों कळो देईना । कोणास ठाउकें होयेना । देवेंविण अनुमानेना । कोणास देव ॥ ११ ॥ देव पाहावयकारणें । देउळें लागती पाहाणें । कोठेंतरी देउळाच्या गुणें । देव प्रगटे ॥ १२ ॥ देउळें म्हणिजे नाना शरीरें । तेथें राहिजें जीवेश्वेरे । नान शरीरें नाना प्रकारें । अनंत भेदें ॥ १३ ॥ चालतीं बोलतीं देउळें । त्यामधें राहिजें राउळें । जितुकीं देउळें तितुकीं सकळें । कळली पाहिजे ॥ १४ ॥ मछ कूर्म वाराह देउळें । भूगोळ धरिला सर्वकाळें । कराळें विक्राळें निर्मळें । कितियेक ॥ १५ ॥ कित्येक देऊळीं सौख्य पाहे । भरतां आवघें सिंध आहे । परी तें सर्वकाळ न राहे । अशाश्वत ॥ १६ ॥ अशाश्वताचा मस्तकमणीं । जयाची येवढी करणी । दिसेना तरी काय जालें धनी । तयासीच म्हणावें ॥ १७ ॥ उद्भवोन्मुख होतां अभेद । विमुख होतां उदंड खेद । ऐसा अधोर्ध संवाद । होत जातो ॥ १८ ॥ सकळांचे मूळ दिसेना । भव्य भारी आणी भासेना । निमिष्य येक वसेना । येके ठाइं ॥ १९ ॥ ऐसा अगाध परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । तुझी लीळा सर्वोत्तमा । तूंच जाणसी ॥ २० ॥ संसारा आलियाचें सार्थक । जेथें नित्यानित्यविवेक । येहलोक आणी परलोक । दोनीं साधिले ॥ २१ ॥ मननसीळ लोकांपासीं । अखंड देव आहिर्निशीं । पाहातां त्यांच्या पूर्वसंचितासी । जोडा नाहीं ॥ २२ ॥ अखंड योग म्हणोनि योगी । योग नाहीं तो वियोगी । वियोगी तोहि योगी । योगबळें ॥ २३ ॥ भल्यांची महिमा ऐसी । जे सन्मार्ग लावी लोकांसी । पोहणार असतां बुडतयासी । बुडों नेदावें ॥ २४ ॥ स्थूळसूक्ष्मतत्वझाडा । पिंडब्रह्मांडाचा निवाडा । प्रचित पाहे ऐसा थोडा । भूमंडळीं ॥ २५ ॥ वेदांतीचें पंचिकर्ण । अखंड तयाचें विवर्ण । महांवाक्यें अंतःकरण । रहस्य पाहे ॥ २६ ॥ ये पृथ्वीमधें विवेकी असती । धन्य तयांची संगती । श्रवणमात्रें पावती गती । प्राणीमात्र ॥ २७ ॥ सत्संग आणी सत्शास्त्रश्रवण । अखंड होतसे विवर्ण । नाना सत्संग आणी उत्तम गुण । परोपकाराचे ॥ २८ ॥ जे सद्कीर्तीचे पुरुष । ते परमेश्वराचे अंश । धर्मस्थापनेचा हव्यास । तेथेंचि वसे ॥ २९ ॥ विशेष सारासार विचार । तेणें होय जग्गोद्धार । संगत्यागें निरंतर । होऊन गेले ॥ ३० ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे देवबळात्कारनाम समास पहिला ॥ #dasbodh #दासबोध #चालूसमास #chalusamasnirupan #दासबोधनिरूपण #dasbodhnirupan