У нас вы можете посмотреть бесплатно चार पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर 'महाराष्ट्र केसरी' | Life is Beautiful with Pruthviraj Mohol | Aarpaar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#aarpaar #maharashtrakesari2025 #prithvirajmohol कुस्ती हा महाराष्ट्रात फक्त खेळ नाही तर एक भावना म्हणून बघितली जाते. कित्येक पैलवान तालमीत घाम गाळून सराव करतात, त्यातीलच एक पैलवान पृथ्वीराज मोहोळ जो महाराष्ट्र केसरी 2025 चा मानकरी झाला आहे. त्याने आरपारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की कसा तो लहानपणापासून तालमीत जात होता, आजोबा, वडिल, काकांना पाहून कशी कुस्तीची आवड निर्माण झाली, एखाद्या पैलवानाला कसं राहावं लागतं, कित्येक महिने घरापासून लांब राहून सराव करावा लागतो, सणावारालाही घरी जाता येत नाही अशा अनेक गोष्टी त्याने सांगितल्या. खालकर तालमीत लहानाचा मोठा झालेला पृथ्वीराज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतो. खालकर तालमीचे वस्ताद संभाजी सखाराम आंग्रे यांनी खालकर तालमीचा संपूर्ण इतिहास सांगितला, त्यासोबत पृथ्वीराजचे कष्ट आणि त्याचं कुस्तीसाठी असलेलं समर्पणही सांगितलं. पुढे पृथ्वीराजने वस्ताद यांचा आदर, कुस्तीची माहिती, कुस्तीवर असलेल प्रेम आणि त्याचा स्वतःचा प्रवास मुलाखतीत मांडला आहे. दिल्लीतला सराव ते खालकर तालमीतले, मातीतले कष्ट याबद्दलची सगळी माहिती त्याने दिली. या दरम्यान पृथ्वीराजने घरच्यांपासून लांब राहण्याचं दुःख जरी असलं तरी कुस्ती करता येण्याचं समाधानही व्यक्त केलं आणि या सगळ्यात मित्रांची त्याच्या आयुष्यात काय भूमिका राहिली, मित्र किती महत्त्वाचे आहेत हे त्याने सांगितलं. पृथ्वीराजच्या वडिलांनी सांगितलं की पैलवान होणं जितकं अवघड आहे त्याहून अवघड आहे पैलवानाचे पालक होणे! एखादा पैलवान घडायला जितके त्या पैलवानाचे कष्ट असतात, त्याच्या इतकेच बहुदा त्यापेक्षा जास्तच त्या पैलवानावरती, त्याचे वस्ताद आणि त्याचे घरचे, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कष्ट असतात. आपल्या आजोबांचं बोट धरून तालमीला जाण्यापासून ते स्वतःच्या जोरावर महाराष्ट्र केसरी होण्याचा प्रवास या पैलवानाने कसा पार केला हे जाणून घेऊ. गेल्या चार पिढ्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करणाऱ्या या पैलवानाची प्रेरणादायी गोष्ट नक्की बघा आरपारच्या 'Life is beautiful' सेगमेंटमध्ये! Life Is Beautiful Credits: Sponsors: Barva Skin Therapie Producer: Ashwini Teranikar, Vinod Satav. Creative & Content Head: Shivprasad Dhage. Video Editing & Thumbnail: Rupesh Jagtap. Host: Maithily Apte. Research: Maithily Apte, Shivprasad Dhage. Camera: Sourabh Sasane, Kaustubh Chavan, Rupesh Jagtap. Video Production, Coordination: Sayali Kshirsagar, Nikhil Mane. Reel Editing: Rupesh Jagtap.