У нас вы можете посмотреть бесплатно Laadki bahin yojana | Poll Pandit | लाडकी बहीण योजना | Devendra Fadnavis | Eknath Shinde | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
‘लाडकी बहीण योजना’ने बदललं महिलांचं आयुष्य? सर्वेक्षणातील धक्कादायक आकडे | लाडकी बहिण योजनेचे महिला कुणाला श्रेय देतात ? नवी आकडेवारी धक्कादायक | मतदानावर ‘लाडकी बहीण योजना’चा प्रभाव किती? पुण्यातील Poll Pandit चा अभ्यास महिलांची मतपेढी तयार होतेय का? ‘लाडकी बहीण योजना’वर मोठा अहवाल #LadkiBahinYojana #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #WomenEmpowerment #MaharashtraNews #ElectionAnalysis #PoliticalSurvey #AzadMarathi देशभरातील विविध निवडणुकांमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारी योजनांचे लाभार्थी आणि त्यातून निर्माण होणारी मतपेढी हा नवीन राजकीय कल समोर येताना दिसत आहे. यामध्ये अलीकडच्या काळात सर्वाधिक चर्चा ‘लाडकी बहीण योजना’ची झाली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ‘पोल पंडित’ संस्थेने राज्यभरातील महिला लाभार्थ्यांशी संवाद साधून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिणामांचा सखोल अभ्यास केला आहे. हा अहवाल २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला. सत्ताधारी पक्ष या योजनेकडे ‘महिला सक्षमीकरणाचा मार्ग’ म्हणून पाहतो, तर विरोधकांच्या मते ही योजना ‘निवडणूक जिंकण्याचे साधन’ आहे. या राजकीय वादाच्या पलीकडे जाऊन, “ही योजना खरोखरच महिलांच्या आयुष्यात काय बदल घडवते?” या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. ⸻ सर्वेक्षणाची व्याप्ती • महाराष्ट्रातील ७ प्रशासकीय विभाग • १३९ विधानसभा मतदारसंघ • ५,३२६ महिलांशी प्रत्यक्ष संवाद • त्यापैकी ४,२२७ महिला या योजनेच्या लाभार्थी • कालावधी: ११ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२६ Random Sampling to Probability Proportionate पद्धतीने निवडलेल्या महिलांशी ९ प्रश्नांच्या आधारे संवाद साधण्यात आला. ⸻ सर्वेक्षणातील महत्त्वाची निरीक्षणे १) नियमित लाभ • ५६% महिलांना हप्ता नियमित मिळतो • ४४% महिलांना हप्ता नियमित मिळत नाही २) आर्थिक स्वायत्तता • ८१% महिला पैसे खर्च करताना कोणालाही विचारत नाहीत • १९% महिला घरातील पुरुषांना विचारून खर्च करतात ३) पैशांचा उपयोग • ३८% – घरगुती खर्च • २३% – स्वतःसाठी • २२% – मुलांच्या शिक्षणासाठी • ५% – बचत • ४% – छोटा व्यवसाय / उद्योग सुरू ⸻ परिणामांचे विश्लेषण आर्थिक परिणाम • ५९% महिलांचा आर्थिक ताण कमी झाला • ३१% महिलांचा काही प्रमाणात ताण कमी झाला सामाजिक परिणाम • ६९% महिलांचा कुटुंबीय आणि आर्थिक निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढला • २३% महिलांच्या मते कोणताही बदल झाला नाही राजकीय परिणाम • ६३% महिला मतदान करताना स्वतःचा निर्णय स्वतः घेतात • ३७% महिला घरातील पुरुषांच्या सल्ल्याने मतदान करतात ⸻ मतपेढी कशी घडते? • ७९% महिला मतदान करताना ‘लाडकी बहीण योजना’ला प्राधान्य देतात • १७% महिला या योजनेला मतदानात प्राधान्य देत नाहीत ⸻ राजकीय श्रेयाबाबत मतप्रवाह • ३७% – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • ३१% – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे • १६% – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार • १३% – महायुती सरकार ⸻