У нас вы можете посмотреть бесплатно श्रीकृष्णाय नम: १२ | निष्काम कर्मयोग व नामस्मरणाचे रहस्य; परमेश्वराची भक्तिसहाय्यक पाच रूपे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भगवान श्रीकृष्णाने प्रतिपादित केलेला ‘निष्काम कर्मयोग’ हा भक्तीमध्ये प्रगती करण्याचा जणू राजमार्गच आहे. आपण आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सतत काही ना काही कर्म करतच असतो, पण ते ‘निष्काम’ नसल्यामुळे त्यातून नवनवीन प्रारब्ध निर्माण होतच राहते. तरीपण, अगदी संपूर्ण आयुष्य सरले तरीही, पूर्णपणे समाधानी असा कोणीच दिसत नाही. ‘काही ना काहीतरी करायचे राहून गेले’ अशीच खंत प्रत्येकजण व्यक्त करताना दिसतो. असे का होते? दि. २८ ऑगस्ट १९९७ रोजी केलेल्या श्रीकृष्णावरील प्रवचनाची सुरुवात सद्गुरु अनिरुद्ध बापू ह्याच मुद्याने करतात. नामस्मरण हेदेखील एक कर्मच आहे. पण नुसते तोंडाने परमेश्वराच्या नामाचे उच्चारण करणे म्हणजे नामस्मरण नव्हे, हे स्पष्ट करून सद्गुरु अनिरुद्ध इथे, ‘नामस्मरण म्हणजे नक्की काय’ हे महर्षि वाल्मिकींच्या, व शिळा होऊन पडलेल्या गौतमपत्नी अहिल्येच्या कथांद्वारे समजावून सांगतात. त्याचवेळी, परमेश्वर आपल्या ज्या पाच रूपांद्वारे ह्या विश्वाचा कारभार चालवतो, ती पाच रूपे कोणती, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भक्तीमध्ये प्रगती साधता येऊ शकते, हेदेखील ते उलगडून सांगतात. त्याचबरोबर, परमेश्वराने निर्माण केलेल्या ह्या विश्वाचा, त्यातील गोष्टींचा मानवाने जरूर उपभोग घ्यावा, पण ते करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे, त्याबद्दलही ते सावध करतात. परमेश्वराचे त्याच्या भक्तांवर, पुण्यवान माणसांवर जितके प्रेम असते, तितकेच प्रेम त्याचे महापाप्यांवरही असते, ह्या सत्याचा विपर्यास करून परमेश्वराबद्दल शंका उत्पन्न केली जाते. इथे सद्गुरु बापू ह्या दोन्हींमधील फरक नीट समजावून सांगून ह्यासंबंधी असणारे गैरसमज दूर करतात. सरतेशेवटी, परमेश्वराचे कारुण्य अकारण असले तरीदेखील ते प्राप्त होण्यासाठी आम्ही काय करणे आवश्यक आहे, हे ते समजावून सांगतात. #AniruddhaBapu #krishnaquotes #radhakrishna ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------