У нас вы можете посмотреть бесплатно केळी पिकाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी हे नक्की करा | केळी चीलिंग | keli pik niyojan | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध! 👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/ ==================================================================== 👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय - 🌱केळी पिकाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी हे नक्की करा | केळी चीलिंग | keli pik niyojan | #banana👍 केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक असून या पिकाची जळगाव जिल्ह्यात जास्त प्रमाणामध्ये लागवड होते म्हणून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार असे म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही केळीचे क्षेत्र वाढत आहे. या व्हिडिओमध्ये आपण केळीचे थंडीपासून संरक्षण कसे करावे याबद्दल जाणून घेणार आहोत. राज्याच्या बऱ्याच भागात आता थंडी सुरू झाली आहे केळीसाठी 16 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. हिवाळ्यात तापमान 16 अंश सेल्सिअसच्याही खाली जाते. या कालावधीत कमाल आणि किमान तापमानातील कमी - अधिक फरकामुळे केळीच्या कंद, घड, मुळे आणि पानांवर विपरीत परिणाम होत असतो. सद्यस्थितीत मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये लागवड केलेली कांदेबाग काढणीच्या अवस्थेत, या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात लागवड केलेली बाग फळवाढीच्या अवस्थेत व या वर्षी जून महिन्यात लागवड केलेली बाग शाखीय वाढीची अवस्था संपवून निसवण्याच्या अवस्थेत आहेत. केळीच्या या सर्व अवस्था कमी तापमानास अत्यंत संवेदनशील असून केळीच्या चांगल्या वाढीसाठी तसेच उत्पादन व गुणवत्तेसाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 👉मुळावर होणारा परिणाम - उती सवंर्धित रोपाची कांदेबाग लागवड झालेली आहे; पण कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते. तसेच कमी तापमानामुळे मुळांच्या अन्न व पाणी शोषणाची कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यासाठी ह्यूमिक ऍसिड २०० ग्राम + एन पी के जिवाणू ५०० ग्राम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. प्रति रोप ४० मिली द्रावण ड्रेंचिंग करावी. 👉पानांच्या वाढीवर होणारा परिणाम - केळीला सरासरी 3 ते 4 पाने प्रति महिन्याला येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो, त्यामुळे प्रति महिना 2 ते 3 पाने येतात, कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात, त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशच्या संपर्कात येतो, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. परिणामी झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर परिणाम होतो. 👉केळीच्या झाडाच्या वाढीवार होणारा परिणाम - कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते, वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी केळी निसवण्याचा कालावधी लांबतो त्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढतो. 👉बुंध्यावर व घडावर होणारा परिणाम - कमी तापमानामुळे केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात हे चट्टे वाढत जातात व घड सटकतो. 👉फळवाढीवर होणारा परिणाम - थंडीच्या काळात घडातील केळीची वाढ फार हळुवार होते. परिमाणी घड पक्व होण्याचा कालावधी 30 ते 40 दिवसांनी वाढतो, त्यामुळे घड काढणीस वेळ लागतो. यासाठी केळीचा घड पूर्ण नीसल्यानंतर व केळफुल तोडल्यानंतर घडावर ००:५२:३४ - १ किलो + नॅनो युरिया ५०० मिली + स्टिकर २५ मिली यांची एकत्रित फवारणी करावी. यामुळे फळांची लांबी व घेर वाढून वजन ही वाढते. 👉रोगाच्या प्रादुर्भावावर परिणाम - थंडीच्या काळात प्रामुख्याने केळीवर सिगाटोका व जळका चिरुट या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी आदामा बम्पर बुरशीनाशक २०० मिली किंवा साफ ४०० ग्राम किंवा बाविस्टीन २०० ग्राम सोबत स्टिकर २५ मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 👉केळी पिकाचे थंडी पासून संरक्षण कसे करावे? 1. केळी बागेस रात्री किंवा पहाटे लवकर पाणी द्यावे. केळीच्या बागेभोवती रात्रीच्या वेळेस ओला व वाळलेला कचरा एकत्र मिसळून फक्त दूर होईल अशा पद्धतीने जाळावा म्हणजे तापमान वाढण्यास मदत होते. 2. बागेची हलकीशी टाचणी करून माती हलवून भेगा भरून घ्याव्यात. त्यामुळे केळी पिकाच्या मुळांवर होणारा कमी तापमानाचा परिणाम टाळला जातो. तसेच बुंध्याभोवती सोयाबीनचा भुसा किंवा शेतातील इतर सहज उपलब्ध साहित्य वापरून आच्छादन करावे. केळीच्या घडांना 100 गेज जाडीच्या 6 सच्छिद्रता असलेल्या पॉलिथिन पिशवी चे आवरण घालावे. 3. केळीचे खोड मोडून लोंबकळत असलेल्या वाकलेल्या परंतु निरोगी पानांनी झाकावे. केळी बागेच्या चारही बाजूस शेवरी, गजराज, बांबू, सुरू, ग्रीन ग्रास यासारख्या वारा प्रतिबंधक झाडांची पट्टे दोन ओळीत लावावे. त्यामुळे थंड वारे अडवले जाऊन केळी बागेचे संरक्षण होते. तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस - 👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl 👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe 👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe 👉इंस्टाग्राम मराठी - https://bit.ly/3B9Ny8G 👉इंस्टाग्राम हिन्दी - https://bit.ly/45XAj88 👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/ 👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z 👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt 👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal