У нас вы можете посмотреть бесплатно ( или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मागच्या व्हिडिओ ची लिंक • (Marathi language)जोर/दंड video २ , जोर कर... नमस्कार मी वरद आणि माझा मित्र पहेल्वान श्रीराज स्वागत करतो आपल्या सर्वांचे Indian Physical Culture आमच्या या YouTube channel वर , दंड व्यायाम ह्या मलिकेवरील हा आमचा चौथा व्हिडिओ आहे . आपल्यापैकी काही जण याला हिंदू पुश-अप व जोर या नावाने देखील ओळखतात. दंड किंवा जोर हा पारंपारिक भारतीय व्यायामाचा भाग आहे .या व्हिडिओमध्ये आपण साधरण दंड किंवा साधे jor करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बद्दल चर्चा करणार आहोत. जोर कढण्याची पहिली पद्धत आपण बहुतेक पारंपारिक व्यायामशाळा , तालीम किंवा आखाड्यांमध्ये पाहतो. मागील व्हिडिओमध्ये आम्ही हात आणि पायान मधील योग्य अंतर घेण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा केली होती, त्याची लिंक आम्ही description मध्ये दिली आहे. हातपायांमध्ये योग्य अंतर घेतल्यानंतर, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जोर ची initial position घ्या जी अधोमुख श्वानासन आहे . सुरुवातीच्या स्थितीत तुमची कंबर वरच्या दिशेने ठेवा आणि दोन्ही पायाची बोटे जमिनीला टेकवा . आता जोर व्यायाम साठी च्या सूचना - प्रथम जोर व्यायामाची सुरुवातीची स्थिती घ्या , जी अधोमुख श्वानासन आहे. २) या स्थितीतून तुमचे कोपर वाकवा आणि तुमचे डोके जमिनीशी समांतर ठेवा आणि आता पुढे सरकत lower plank किंवा चतुरंग दंडासान स्थितीत या. 3)आता lower plank स्थितीतून तुमच्या शरीर वर ढकलून तुमचे कोपर सरळ करा आणि व्हिडिओ मधील दाखवलेल्या स्थितीत या. ही अंतिम स्थिती आहे ज्याला उर्ध्वमुख श्वानासन म्हणतात. हि होती साधे जोर व्यायाम करण्याचा एक पद्धत. २) आता साधे जोर व्यायाम प्रकार दुसरा. ह्या प्रकारचे जोर बाळंभट्ट दादा देवधर यांच्या संप्रा दायातील आहे. पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठा राजेशाही मध्ये बाळंभट्ट दादा देवधर हे एक उत्तम पैलवान होते. त्यान्ना आधुनिक मल्लखांब चे जनक म्हणून देखील ओळखतत . वरील प्रकारच्या जोर साठीच्या सूचना याप्रमाणे आहेत - प्रथम जोर व्यायामाची प्रारंभिक स्थिती किंवा initial position घ्या, जसे आपण आधी चर्चा केली होती पण येथे आपल्याला टाचांसह संपूर्ण पाय जमिनीवर ठेकवायचे आहे. आता तुमचे डोके मागे घेऊन तुमची हनुवटी छातीला टेकवा . २) या स्थितीतून तुमचे कोपर वकवा आणि तुमचे डोके जमिनीशी समांतर ठेवा. नंतर या स्थितीतून पुढे सरकून lower plank स्थितीत या . 3) आता lower plank स्थितीतून वरच्या दिशेने जात , तुमचे शरीर कंबरेपर्यंत वर ढकलून , तुमचे कोपर सरळ करा. 4) आता डोके वर करून छता कडे किंवा आकाशा कडे बघा. ही अंतिम अवस्था आहे , ज्याला उर्ध्वमुख श्वानासन असे म्हणतात . आता जोर व्यायामासाठी श्वासोच्छवासाची पद्धत , हि प्रोफेसर कोडी राममूर्ती नायडू यांनी सांगितलेली आहे. प्रोफेसर कोडी राममूर्ती नायडू यांनी सांगितलेली श्वासोच्छवासाची पद्धत या प्रमाणे आहे, सुरुवातीच्या स्थितीत श्वास घ्या आणि अंतिम स्थितीत श्वास सोडा. ह्या होत्या साध्या जोर व्यायाम करण्याचा काही पद्धती . जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडला असेल तर कृपया आमच्या channel la लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली comment section मध्ये तुमची मते शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. #maharashtra #akhada #व्यायाम #desi #desiworkout #fitindiamovement #indian #viral #kushti #pushups #talim #calesthenic #bodyweightworkout #exercise #america #wrestling #health #fitness #pushups #wordfamily #bharat #india #sports #sport #martialarts#मराठी #मराठा