У нас вы можете посмотреть бесплатно ॲडव्हांटेज विदर्भ 2026 | नागपुरात 15 हजार कोटींची गुंतवणूक или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नागपुरात आज ॲडव्हांटेज विदर्भ 2026 या खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. या महोत्सवात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत 15 हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला असून, नागपूरमध्ये पहिल्यांदाच वाहन उद्योगाचं पदार्पण झालं आहे. या गुंतवणुकीतून नागपुरात नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक वाहनं आणि ट्रॅक्टरचं उत्पादन होणार आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरवठा केंद्र आणि नाशिकमध्ये विस्तार केंद्र उघडण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यामुळे पुण्यानंतर नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ही राज्यातील मोठी वाहन उद्योग केंद्रं ठरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, 🔹 गडचिरोलीत जगातील सर्वात मोठं हरित पोलाद केंद्र 🔹 नागपुरात देशातील सर्वात मोठं सोलर मॉड्यूल उत्पादन केंद्र 🔹 अमरावतीत आशिया खंडातील सर्वात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. तसंच जर्मनीच्या एन मोटिव्ह कंपनीसोबत 10 हजार कोटींचा गीगा कास्टिंग करार, भविष्यातील विस्तार, 80% उत्पादन निर्यात, आणि 6 हजार प्रत्यक्ष व 10 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील गरिबी व बेरोजगारी दूर करून येत्या 5 वर्षांत 5 लाख रोजगार निर्माण करण्याचा विश्वास व्यक्त केला. 📌 विदर्भाचा सर्वांगीण विकास, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या दृष्टीने हा महोत्सव मैलाचा दगड ठरणार आहे.